News
साहेब क्लासेस सावंतवाडी तर्फे दि. १० मे २०२२ पासून उन्हाळी शिबीर (Summer Camp) आयोजित करण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे झालेल्या खंडानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या शिबिराला मुलांनी उत्साहाने प्रतिसाद दर्शवला.
अनेक वर्षांपासून साहेब क्लासेस उन्हाळी शिबीर राबवीत आहेत, यावर्षी ‘लर्न विथ फन’ या थीम च्या आधारे त्यांनी मुलांसाठी विविध उपक्रम राबवले. या उपक्रमांमधून मजेशीर पद्धतीने नवीन कौशल्य शिकणे ही मुलांसाठी पर्वणीच होती.
मुलांना संभाषण कौशल्य, संगणक कौशल्य, इंग्लीश स्पीकिंग याबाबतचे मार्गदर्शन यांनी केले, आणि त्यानिगडीत असलेल्या विविध गमतीशीर खेळामुळे त्यांच्या ज्ञानात अधिकच भर पडली. डॉ. संगीता तुपकर यांच्या द्वारे घेण्यात आलेल्या योग अभ्यासामुळे मुलान्मधे आरोग्य विषयक गोडी निमार्ण झाली. लहान मुलाना चंद्र तार्याचे कुतुहल असतेच. श्री.संदेश गोसावी यांच्याद्वारे घेतलेल्या स्टारगेझींग या उपक्रमातुन मुलाना अवकाशाची सफर घडुन आली. चित्रकलेची आवड मुलान्मधे आवर्जुन असते. श्री. पोलाजी सर यानी शिकवलेल्या चित्रकलेतील सोप्या सरळ रचनेमुळे मुलाना चित्रकलेवीषयी अधीक माहिती मिळाली. मुलाच्या बुद्धिला चालना मिळण्यासाठी श्री तेजराज रेमुळकर यांच्याद्वारे बुद्धिबळाचे आयोजन करण्यात आले. बुद्धिबळावीषयक माहिती देउन मुलभुत गोष्टी मुलाना शिकवण्यात आल्या जेणेकरुन त्याना बुद्धिबळाची आवड निर्माण होइल.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच या मुलांना आपल्या ध्येयनिश्चितीसाठी आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याना काय करावे लागेल याविषयक माहिती देण्यात आली. या १२ दिवसांच्या शिबिरानंतर समारोप समारभाच्या दिवशी श्री. शिवाजी पाटील यांच्य हस्ते सर्व विद्यार्थ्यांना Summer Camp सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा देऊन समारंभाची सांगता करण्यात आली.